🌟पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील थुना नदीवरील वळण रस्ता पाण्यात बुडाल्यामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प....!


🌟कंत्राटदाराने केलेला पर्यायी वळण रस्ता वाहन धारकांसह प्रवास्यांसाठी ठरतोय धोकादायक🌟 


पुर्णा (दि.०२ ऑगस्ट २०२४) :- पुर्णा तालुक्यातील पुर्णा ते झिरो फाटा ते पूर्णा  रोडवरील माटेगाव येथील थुना नदीवरील, पुलाचे काम मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे. जुना पूल पाडल्यामुळे या पुलाच्या बाजूने सदरील कंत्राटदाराने, पर्यायी रस्ता अरुंद चार फुटी सिमेंटच्या नळ्या टाकून कमी उंचीचा जमिनीलगत थातूरमातूर केला आहे. यामुळे देखील मागील उन्हाळ्यात  या ठिकाणी दोनदा अपघात घडले, परंतु पावसाळ्यात मात्र या पर्यायी अरुंद रस्त्यावर अनेकदा वरून पाणी गेले. त्यातच काल ता.२ शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे नदीला पूर आला यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारापर्यंत वाहतूक ठप्प होती. यावेळी त्या पाण्यातून शेतकरी महिला प्रवासी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते यामुळे कधी जीवित हानी होईल याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी पर्यायी रस्ता धोकादायक बनला आहे यावरून वाहनधारकांना जाणे येणे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वळन रस्त्यावर  रात्रीच्या वेळी पथदिवे, रेडियम, दिशादर्शक बोर्ड लावलेले नाहीत यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.

सदरील कंत्राटदारांने या रस्त्याची उंची,व रुंदी वाढवून रस्ता  मजबूत करावा अशी मागणी शेतकरी आणि प्रवासी वर्ग व्यक्त करीत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या