🌟भारताच्या 'मेडल बॉय'ची पुन्हा एकदा रौप्य पदकाला गवसणी🌟
भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत रोमहर्षक लढतीत रौप्य पदकावर आपली मोहोर उमटवली आहे. टोकियो ऑलिम्पिक नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी बजावणारा नीरज पहिला भालाफेकपटू ठरला आहे. तुझे ध्येय, चिकाटी, जिद्द यातून मिळवलेल्या यशातून तु देशातील तमाम युवा खेळाडूंना एक आदर्शच जणू घालून दिला आहेस.
नीरज, तमाम देशवासियांना तुझा सार्थ अभिमान आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या तुझ्या देदीप्यमान कामगिरीकरता तुझे हार्दिक अभिनंदन तसेच भालाफेक खेळातील भावी कारकिर्दीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या मनःपूर्वक शुभेछा......
0 टिप्पण्या