🌟गंगाखेड विधानसभा निरिक्षक म्हणून या काळामध्ये प्रामाणिक पणे काम करणार - मनबीरसिंघ ग्रंथी
नांदेड (दि.05 ऑगस्ट 2024) :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गंगाखेड विधानसभा युवकच्या निरिक्षकपदी प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन गंगाखेड विधानसभा मतदारसंघ-परभणी जिल्हा या मतदारसंघात पक्षा संघठनात्मक बांधणीसाठी ग्रंथी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे असे युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबुब भाई शेख यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. दरम्यान गंगाखेड विधानसभा निरिक्षक म्हणून या काळामध्ये प्रामाणिक पणे काम करणार असल्याचे मनबीरसिंघ ग्रंथी यांनी सांगितले.....
0 टिप्पण्या