🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचे प्रतिपादन🌟
परभणी कृषी विद्यापीठ येथे ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्या शेतकऱ्यांच्या शेतावर ड्रोन ची फवारणीसाठी अगोदर नोंदणी करणे गरजेचे आहे त्या नोंदणीसाठी प्रति एकर 500 रुपये भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे असे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे,व विभाग प्रमुख सौ डॉ स्मिता सोळंकी यांनी सांगितले व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे पण सांगितले माननीय कुलगुरू प्रा.डॉ.इंद्रमणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ मध्यवर्ती प्रक्षेत्रावर ड्रोन द्वारे फवारणीचे फवारणी करण्यात आली.. यामध्ये फवारणी करिता प्रति एकर 15 मिनिट एवढा वेळ लागतो. त्यामुळे वेळेची बचत पण होईल आणि औषधाचा खर्च पण कमी होईल आणि औषधामुळे होणारे दुष्परिणाम व फवारणी करताना सुरक्षा पण मिळेल म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रोन या यंत्राचा वापर करावा फवारणी बुकिंग तसेच पैसे भरल्या नंतर फवारणी करिता शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे, याच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे
या प्रात्यक्षिका करिता मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ.विलास खर्गखराटे, पशु शक्तीचा वापर योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. स्मिता सोळंकी, कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.सुनील उमाटे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे, सहाय्यक कीटक शास्त्रज्ञ डॉ.दिगंबर पटाईत आणि डॉ.अनंत लाड क्रांतीशास्त्राचे संपादक धम्मपण हनवते प्रगतिशील शेतकरी जनार्दन आवरगंड खंदारे व हे प्रादेशिक यशस्वी करण्यासाठी रावेतील विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या