🌟शहरातील महावीर नगर मधील शनी मंदीर सभागृहात खुल्या प्रवर्गातील समाजासाठी बैठकीचे आयोजन🌟
पुर्णा (दि.१६ ऑगस्ट २०२४) :- पुर्णा शहरातील येथील महावीर नगर मधील शनी मंदीर सभागृहात खुल्या प्रवर्गातील समाजासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ( अमृत ) या स्वायत्त संस्थेच्या बैठकीचे शनिवारी दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला अमृतचे पदाधिकारी आणि वक्ते भूषण धर्माधिकारी,विभाग समन्वयक दिपक जोशी,परभणी समन्वयक अनंत जोगदंड यांच्यासह अन्य पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत तरी सर्व खुल्या गटातील युवक,युवती,उद्योजक यांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन अनंत जोगदंड यांनी केले आहे.........
0 टिप्पण्या