🌟परभणीचे जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांचा वाढदिवस भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने साजरा 🌟
( फोटो : विविध फळाची रोपटे जिल्हा पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी व सौभाग्यवरती प्रीती परदेशी यांच्या हस्ते लागवड करतांना व सर्व शेतीतील विविध उत्पादनर देताना सर्व शेतकरी कष्टाकरी उपस्थित.)
परभणी :- कोणालाही समाधानाने दिले तर आपल्यालाही भरभरून मिळते हेच विचार आईने संस्कारातून रुजवले म्हणून परभणीत कष्टकरी शेतकरी यांनी उत्पादन वाढवण्यासाठी ग्रुप करून जिद्दीने फुलाची माळ गुंफल्या सारखी प्रेमाची माणसं जोडली हेच माझे भाग्य समजतो असे मत परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केले भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने परभणी येथील पोलीस अधीक्षक यांचा वाढदिवस फळे, भाजीपाला व इतर घरी बनवलेले खाद्यपदार्थ देऊन साजरा केला.प्रसंगी अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी व त्यांच्या पत्नी प्रीती परदेशी यांना काशी भोपळा,लोणचे मध,रानभाज्या,हळद,गिरगायीचे तूपण,केळी, गवऱ्या, गोमूत्र देऊन टाकाऊ पदार्थ न देता टिकाऊ जीवन आवश्यक वस्तू देऊन केला साजरा.
वाढदिवस अशाच प्रकारे शेतीतील विविध उत्पादने देऊन सर्वांनी साजरे केले तर जेणेकरून शेतकऱ्यांचा मालाला किंमत येईल व शेतकऱ्यांच्या प्रगती होईल केक गुच्छ इतर वस्तू न देता फळे व भाजीपाला देऊन वाढदिवस केल्याबद्दल परदेशी साहेबांनी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील स्वतः पिकवलेले पिके विकले पाहिजे असे सांगितले या कार्यक्रमाला भाजीपाला ग्रुपचे सदस्य पंडीततराव थोरात,जनार्धन आवरगंड रामेश्वर साबळे, प्रकाश हरकळ, श्याम रेंगे, दत्ता पहारे ,शिवाजी घुले तुळशिराम दळवी, विद्याधर संगई रमेश राऊत, माणिकराव खिल्लारे गिराम मस्के यांच्या सह इतर अधिकारी कर्मचारी शेतकरी आदीची प्रमुख उपस्थिती होती.वाढदिवसाच्या निमित्ताने वरुक्षारोपण करण्यात आले.......
0 टिप्पण्या