🌟घरभाडे भत्त्यांच्या (HRA) दरात वाढ करा : तांत्रिक कामगार युनियनची मागणी.....!


🌟विज कंपनीतील कामगार/अधिकारी/अभियंतांना शासन आदेशाप्रमाणे घरभाडे भत्ता दरात वाढ करण्यात यावी🌟 

नागपूर :- महापारेषण, महानिर्मिती व महावितरण कंपनीतील कार्यरत कामगार,अभियंता,अधिकारी यांना शासन निर्णयाप्रमाणे घर भाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावा अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री व तिन्ही वीज कंपनी व्यवस्थापनास केली असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता (DA) 50% केल्यावर, घरभाडे भत्ता (HRA) दरात ही 9%, 18%, 27% वरून अनुक्रमे 10%, 20% 30% अशी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्य शासनाने व तिन्ही कंपनी व्यवस्थापनाने कर्मचारी/अधिकारी/अभियंतांना महागाई भत्ता (DA) दर हा 46% वरून 50% करण्यात आलेला आहे, त्यामुळे घरभाडे भत्ता दरात देखील दरवाढ मिळणे अपेक्षित आहे, शासन निर्णयानुसार 'महागाई भत्ता (DA) हा 25% ची मर्यादा ओलांडेल तेव्हा X,Y,Z या वर्गीकृत शहर/गावांसाठी मिळणारा घरभाडे भत्ता (HRA) दर हा 24%, 16%, व 8% वरून अनुक्रमे 27%, 18%, 9% अशी वाढ होईल असे नमूद आहे, तसेच ज्यावेळी महागाई भत्त्याची रक्कम ही 50 टक्क्यापेक्षा (मर्यादा ओलांडेल) अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना, अनुक्रमे 30%, 20% व 10% अशा वाढीव दराने, घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा," अशा स्पष्ट सुचना आहेत.

त्यानुसार तिन्ही विज कंपनीतील कामगार/अधिकारी / अभियंतांना शासन आदेशाप्रमाणे घरभाडे भत्ता दरात वाढ करण्यात यावी तसेच मागील थकबाकी सुध्दा अदा करावी. अशी मागणी  तांत्रिक कामगार युयिनयनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर. पवार, सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे, आर. आर.ठाकुर, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी पारेषण विक्रम चव्हाण, दत्तु भोईर, किरण कन्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोदे, विक्की कावळे यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या