🌟मुंबई-करीमनगर विशेष गाडीच्या दोन फेर्‍या दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय....!


🌟अशी माहिती दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली🌟

परभणी (दि.१२ सप्टेंबर २०२४) :- दिवाळी आणि दसरा सणा निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने लोकमान्य  तिलक टर्मिनस मुंबई - करीमनगर  विशेष गाडीच्या ०४ फेर्‍या मंजूर केल्या आहेत, अशी माहिती दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.

                     गाडी क्रमांक ०१०६७ लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई - करीमनगर विशेष गाडी दिनांक २९ ऑक्टोंबर आणि ०५ नोव्हेंबर २०२४ ला दर मंगळवारी लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई रेल्वे स्थानकावरून दुपारी १५.३० वाजता सुटेल आणि ठाणे, कल्याण,इगतपुरी, नाशिक,मनमाड, अंकाई, नगरसोल, औरंगाबाद, जालना,परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, अरमु, मेटपल्ली, कोरतला मार्गे करीमनगर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ०८.३० वाजता पोहोचेल.

             तसेच गाडी क्रमांक ०१०६८ करीमनगर - लोकमान्य  तिलक टर्मिनस मुंबई विशेष गाडी दिनांक ३० ऑक्टोंबर आणि ०६ नोव्हेंबर २०२४ ला दर बुधवारी करीमनगर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी १७.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच लोकमान्य  तिलक टर्मिनस मुंबई येथे दुसर्‍या दिवशी दुपारी १३.४० वाजता पोहोचेल. दरम्यान, या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून २२ डब्बे असतील, अशी माहिती जनसंपर्क विभागाने दिली.

* अजंठा एक्सप्रेसच्या मनमाड येथील वेळेत बदल :-

              गाडी क्रमांक १७०६३ मनमाड-अजंठा एक्सप्रेस च्या मनमाड येथील वेळेत बदल करण्यात आला आहे. ही गाडी २१ सप्टेंबर २०२४ पासून मनमाड येथून २०.४० वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली असून प्रवाशांनी कृपया हा बदल लक्षात घ्यावा, असे आवाहन केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या