🌟परभणी शहरातील रहिम नगरात प्रभाग आ.डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने आयोजित शिबिरात 05 हजार रुग्णांची तपासणी....!

 


🌟सर्वरोग निदान उपचार शिबिर व मोतीबिंदू पूर्व तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद🌟 

 


  
परभणी :- परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील रहिम नगर येथे परभणी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कार्यसम्राट आ. डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आज रविवार दि.08 सप्टेंबर 2024 रोजी भव्य रोग निदान व उपचार शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास परभणी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर येथील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती या शिबिरात प्रामुख्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी व चष्मे वाटप या सह बीपी, शुगर, हाडांची तपासणी, महीलांविषयचे आजार संधर्भात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करून पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी त्यांना परभणी मेडिकल कॉलेज येथे करण्यात येणार आहे. 


या कार्यक्रमात गौतम भराडे यांच्या वतीने उपस्थित सर्व नागरिक व डॉक्टरांना अन्नदान करण्यात आले या तपासणी शिबिरात पाच हजार पेक्षा ही जास्त महिला, पुरुष, वयोवृद्ध नागरीक व बालकांनी लाभ घेतला असल्याची माहिती यश क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक गौतम भराडे यांनी दिली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम भराडे,राजू सोनवणे,नमु सेठ,माऊली साळवे, अमोल गायकवाड, अमित हराड,अजय वाघमारे,निखिल जैन,भद्री कदम, शेख मुज्जू, पिंटू काळे, वसीम कबाडी, अरुण झांबरे, कपिल मकरंद, बाळा सोनवणे, चंद्रकांत बनसोडे उर्स हांडोरे, चांद लाला, रवी लेंडे, तर आरोग्य समन्वयक म्हणून राहुल कांबळे, प्रसाद चांदणे, मकरंद. कुलकर्णी, राहुल गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या वेळी सर्व पदाधिकारी लोक प्रतिनिधी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडी, यांची अनुपस्थित होती. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल वैराळ यांनी केले तर आभार गौतम  भराडे यांनी मानले,....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या