🌟संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात 188 रक्तदात्यांनी केले रक्तदान.....!


🌟संत निरंकारी मंडळाचे कार्य समाजातील संपूर्ण मानवजातीसाठी मौल्यवान :- ठाणेदार संग्राम पाटील  


✍️ मोहन चौकेकर                                                             

 चिखली :- संत निरंकारी मंडळ ब्रँच चिखलीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर दिनांक 01/09/2024  रविवारी रोजी संत निरंकारी सत्संग भवन शेलूद  खामगाव रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात भरघोस असे 188 रक्तदात्यांनी स्वयंम प्रेरणेने रक्तदान केले. या रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी 8 वाजता मोटार सायकल रक्तदान जनजागृती रॅलीने जिल्हा संयोजक शालिकराम चवरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली.हि रॅली संत निरंकारी सत्संग भवन  येथून निघाली व संपूर्ण चिखली शहरातुन राऊत वाडी स्टॉप या ठिकाणी आली असता या रॅलीचे   फटाके  फोडून व  रॅली वर फुलांचा वर्षाव  करून जंगी स्वागत करण्यात आले व रॅली परत सत्संग भवन येथे 9.00 वाजता आली. व त्यानंतर सकाळी 9.30 वाजता रक्तदान शिबिराचे मोठया थाटात चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या हस्ते विधिवत उदघाटन करण्यात आले. यावेळी वाशीम येथील माधवराव अंभोरे मा. प्रदेशाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद मुबंई, संतोष खोडे मुखी वाशीम, बंडेवार जी,शालिकराम चवरे गुरुजी जिल्हा संयोजक बुलढाणा, हनुमान भोसले मुखी बुलडाणा,राजूजी खंडागळे मुखी जानेफळ,डॉ. प्रकाश शिंगणे,श्रीराम झोरे, अशोक आयलानी कोषाध्यक्ष , गोकुळ शिंगणे,शिवाजी शिराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


 यावेळी आलेल्या सर्व मान्यवर मंडळीचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शालिकाराम चवरे गुरुजी यांनी आपले प्रस्ताविकात सांगितले की संत निरंकारी मंडळ हे आशिया खंडातील एकमेव असे मंडळ आहे की सर्वात  जास्त रक्त संकलन करणारे  एक नंबरचे मंडळ आहे. आज पर्यंत सर्वात मोठी रक्त पेढी हि निरंकारी मंडळाची आहे. त्यानंतर माधवराव अंभोरे यांनी बोलताना सांगितले की संत निरंकारी मंडळ हे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान या सारखे अनेक समाज उपयोगी उपक्रम नेहमी राबवित असते. व समाजाच्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेत असते. शेवटी अध्यक्षीय भाषणात बोलताना  ठाणेदार संग्राम पाटील यांनी सांगितले कि संत निरंकारी मंडळ हे अनेक समाज उपयोगी व राष्ट्र उपयोगी उपक्रम राबवित असते या उपक्रमाचा अनेक समाजातील गरजू नागरिकांना याचा फायदा होत असतो. मी मंडळाचा खूप आभारी आहे कि त्यांनी मला या ठिकाणी बोलावले व मला बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मी मंडळाचे आभार मानतो. या  रक्ततदान शिबिरा मध्ये अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या या मध्ये चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी भेट दिली व आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले कि निरंकारी मंडळ हे नेहमी मोठमोठे सामाजिक उपक्रम राबवित असते व मंडळाला केंव्हाही कोणत्याही प्रकारची अडचण व मदत लागल्यास मी आमदार या नात्यांनी ती पूर्ण करेल असे आश्वासन दिले. तसेच प्राचार्य निलेश गावंडे यांनी सुद्धा या रक्तदान शिबीरला दिली .चिखली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गोविंद गिनोडे यांनी सुद्धा भेट दिली. रक्तदान शिबिरात रक्त संकलित करण्याचे अतिशय महत्वाची सेवा शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा डॉ झगरे यांच्या टीमने  व स्त्री रुग्णालय अकोला डॉ एस. पी. जोशी यांच्या टीम ने पार पाडली.रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता सेवादल अधिकारी महात्मा सेवादल अधिकारी बहेनजी सर्व सेवादल पुरुष व महिलांनी अथक परिश्रम घेतले......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या