🌟अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करून पिक विमा कंपनीच्या आटी रद्द करून शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम मदत तात्काळ द्या.....!


🌟महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟


पुर्णा :- पुर्णा तालुक्यात मागील एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबर या तारखेला अनेक भागात मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली याचा फटका शेतीतील उभ्या पिकांना झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, मूग काडणीसाठी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली असून शेतकऱ्यांच्या जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली पुर्णा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे अशा परिस्थितीमध्ये नुकसान झाल्यावर 72 तासाच्या पिक विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार करणे शेतकऱ्यांसाठी शक्य नाही म्हणूनच शासनाने 72 तासाची अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांचा पंचनामा करून 25%अग्रीम देण्यात यावी व ज्या शेतकरी बांधवांचे घरांची पडझड झाली आहेत जनावरे पुराच्या पाण्यात पाहून गेली आहे अशा शेतकरी बांधवांना शासनाने तात्काळ मदत करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार माधवराव बोथीकर यांना दिलेल्या निवेदनात  मनसेच्या  वतीने देण्याचा आला आहे 

या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के, पुर्णा शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर तालुका अध्यक्ष अनिल बुचाले, उपशहर अध्यक्ष पंकज राठोड, शहर सरचिटणीस ओम यादव उपशहर अध्यक्ष अविनाश मैत्रे , भरत बोबडे ,राजेश यादव, पवन बोबडे, मारुती गोडसे,आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या