🌟विधानसभा निवडणूक पुर्वतयारी करीता पदाधिकार्यांना पक्षाकडून सूचना🌟
परभणी (दि.१२ सप्टेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून पूर्वतयारीकरीता पदाधिकार्यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
येथील वंचित बहुजन आघाडीचा वतीने आज गुरुवार दि.१२ सप्टेंबर रोजी शहरातील कौस्तूभ मंगल कार्यालयात वंचितचे राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हा निरीक्षक अॅड. गोविंद दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय प्रशिक्षण प्रा. डॉ. सुरेश शेळके, विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती, परभणी महानगर अध्यक्ष रणजीत मकरंद, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, युवा शहराध्यक्ष प्रमोद कुठे, जिल्हा महासचिव शिवाजी वाकडे, माजी संघटक ए. जी. खंदारे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
यावेळी परभणी तालुक्यातील तसेच शहरातील विविध प्रभागातील प्रमुख पदाधिकारी यांना विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी विविध सूचना देण्यात आल्या, संपूर्ण ताकतिने कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या कामाला लागावे, यासाठी बूथ कमिटी नियोजन संदर्भातही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. अतुल वैराट यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या