🌟परभणी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड......!

 वृत्त क्र. 476                                दि. 24 सप्टेंबर, 2024


🌟कार्यक्रमाच्या शेवटी चिठ्याद्वारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या निकषांबाबत माहिती देण्यात आली🌟

परभणी (दि. 24 सप्टेंबर 2024) : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) यांचे वतीने अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम बारा पोट जातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी मदत व्हावी तसेच उद्योग / व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता NSFDC सुविधा कर्ज योजने अंतर्गत तसेच MSY महिला समृद्धी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवासी उपजिल्हाधिकारी तथा लाभार्थी निवड समिती अध्यक्ष अनुराधा ढालकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत चिठ्याद्वारे लॉटरी पद्धतीने निवड प्रक्रिया करण्यात आली.

महामंडळामार्फत NSFDC सुविधा कर्ज योजना तसेच महिला समृद्धी योजने अंतर्गत सन 2023-24 या वर्षातील एकूण प्राप्त प्रस्ताव तसेच पात्र प्रस्ताव बाबत NSFDC सुविधा कर्ज योजने अंतर्गत लाभार्थी निवडीचे उद्धिष्ट 50 असून पात्र लाभार्थी पुरुष 175, महिला लाभार्थी 63 असे एकूण 238 पात्र लाभार्थ्यांची चिठ्याद्वारे लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. तसेच महिला समृद्धी योजने अंतर्गतलाभार्थी निवडीचे उद्धिष्ट 30 असून ग्रामीण, शहरी पात्र लाभार्थी महिला 40 लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने प्रत्यक्ष करण्यात आली.

जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी कार्यक्रमाच्या शेवटी चिठ्याद्वारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या निकषांबाबत माहिती दिली. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना निराश न होता महामंडळाच्या विविध चालू असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एन. पवार यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या