🌟निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौऱ्यावर ; निवडणूक आयोग आज काय घोषणा करणार सर्वांचे लक्ष🌟
✍️ मोहन चौकेकर
केंद्रीय निवडणूक आयोगाचं चौदा जणांचे पथक महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असून आज संध्याकाळी आयोग पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान व 20 नोव्हेंबरपर्यंत निकाल असा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा नोव्हेंबरपर्यंत असून त्यापूर्वी नवे सरकार स्थापन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. आज निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या