🌟मुख्यमंत्र्यांनी सचिवांना आदेश देवून ही राज्य दलितमित्र संघाच्या मागण्याचां प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबित....!

         


🌟राज्यातील दलितमित्र,समाजभूषण पुरस्कारार्थी मधे प्रचंड नाराजी🌟                    

हिंगोली (दि.१४ सप्टेंबर २०२४) :- महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलीत मित्र संघाच्या निवेदनातील न्याय मागण्या मंजूर कराव्यात अशी विनंती  हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे ह्यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे कडे अधिवेशन दरम्यान २८ जून २०२४ रोजी प्रत्यक्ष भेटून केली होती.

ह्या अनुशंगाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ह्यांनी  राज्याच्या  सामाजिक न्याय सचिवांना सदरील मागण्या तपासून प्रस्ताव सादर करण्याचे तात्काळ आदेशित केल्याची माहिती आमदार मुटकुळे ह्यांनी महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.विजय निलावार ह्यांना दिली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी,सचिवांना दिलेले आदेशाचे कितपत पालन झाले हे दोन महिने उलटले तरी गुलदस्त्यात असल्याने राज्यातील दलितमित्र,समाजभूषण पुरस्कारार्थी मधे प्रचंड नाराजी पसरली आहे. संघाच्या निवेदनात नमूद बाबीत स्वातंत्र्यसैनिकां प्रमाणे पुरस्कारार्थीना प्रतिमाह मानधन व सर्व शासकीय राष्ट्रीय लोककल्याणकारी उपक्रमास निमंत्रित करून अन्य सर्व  सुविधा देण्यात याव्यात, एस.टी.च्या ताफ्यातील साधी,आराम, निमआराम, बस मधून  एका साथीदारा सह किलोमिटर मर्यादा न लादता सुरू असलेली मोफत पूर्वापार सवलत आता एस टी च्या सर्व बसेस मधून परिपत्रक सुधारून  राज्यातील एसटी राज्या बाहेर जिथवर जाते तिथवर देय करावी,व  किमान दोन सीट चे आरक्षण करण्याची सोय करावी,राज्यातील शासकीय,निमशासकीय धर्मादाय  व सुपर स्पेशियालिटी तसेच खासगी नामांकित रुग्णालयातून दलीतमित्र व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य आणि केंद्र शासनाच्या असलेल्या सर्व आरोग्य सुविधा मोफत सुरू करण्यासाठी ओळखपत्र द्यावे,स्वातंत्र्यसेनानी प्रमाणेच एका साथीदारासह रेल्वे प्रवास सवलत मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सुविधा देय करावी,राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व राष्ट्रीय व लोककल्याणकारी, सेवा कार्याची उद्दिष्ट्य पूर्ती करण्यासाठी दलितमित्राना तालुका ते राज्य पातळीवर  विविध विभागांच्या  अशास्किय सदस्य म्हणून नियुक्त करावे सर्व राष्ट्रीय आणि शासकीय  लोककल्याणकारी  कार्यक्रमात निमंत्रित करण्यात यावे. सा.बा.विभागाच्या विश्राम गृहात देय असलेल्या सुविधा बाबत टाळाटाळ केल्या जाते त्याबाबत सा.बा.विभागास प्राधान्याने देय सुविधा देण्यासाठी आदेशित करावे,असेच एसटी  कडून देय  सुविधा देण्यात बाबत आदेशित करावे,आदी मागण्या संघाच्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. ह्याच धर्तीवर हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे ह्यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेवून सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना दोन महिन्यापूर्वीच आदेशित  करण्यात यश मिळविले. मागील २० वर्षाच्या कालखंडातील अनेक मुख्यमंत्री,उपमुख्य मंत्री,सामाजिक न्याय मंत्री आदींनी केलेल्या घोषणा, संघा सोबतच्या मंत्रालयातील संबंधित मंत्री महोदया सोबतच्या संघाच्या बैठका ह्या केवळ शोभेच्या ठरल्या,मात्र ह्या वेळेसच्या शासन कर्त्यांकडून  फलश्रुती होईल अशी अपेक्षा असताना आजघडीला मात्र दलितमित्र समाजभूषण पुरस्कार्थींन मधे प्रचंड नाराजी पसरली आहे. आचार सहींता लागू होण्यासाठी आता तर काही दिवसच शिल्लक राहिले असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन कधी होणार व कधी न्याय मिळणार अस संघाचे राज्यअध्यक्ष योगेश वागदे,राज्य कार्याध्यक्ष डॉ.विजय निलावार,सरचिटणीस भूषण दडवे,कोषाध्यक्ष वृषाली वाघचौरे,राज्य संघटक हरिश्चंद्र माने गुरुजी,व संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी म्हंटले आहे.मुख्यमंत्र्यां कडेच सामाजिक न्याय विभाग असतानाआणि सचिवांना दोन महिन्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी आदेश देवून ही पुरस्स्कारार्थिना कधी न्याय मिळेल ह्याची प्रतीक्षा महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र समाजभूषण संघ करीत  आहे. तत्कालीन अनेक मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्र्यांनी राज्यातील अनेक जाहीर  कार्यक्रमातून मागण्या मंजूर केल्याच्या घोषणा चे पुरावे संघा कडे असून  घोषणाच हवेत विरल्याने विद्यमान  शासनाने तरी तत्कालीन  शासनकर्त्यानी  केलेल्या पोकळ घोषणा आणि दिशाभुल केलेल्या वक्तत्वांची ची पुनरावृत्ती करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे......

✍🏻दलीत मित्र डॉ.विजय निलावार,ज्येष्ठ पत्रकार हिंगोली तथा राज्यकार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र समाजभूषण संघ(रजी.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या