🌟ज्ञायक राजेंद्र पाटणी हे स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र🌟
फुलचंद भगत
वाशिम:-कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा उमेदवार म्हणून अनेकांनी जनतेत स्वयंघोषित दावेप्रति दावे करण्यास सुरुवात केली आहे आणि आपल्या स्वयंघोषणापत्रास वा स्वनिर्मित माहितीस आपले नाव प्रकाशक म्हणून कीवा माहितीचा कर्ता धरता म्हणून समोर न येऊ देता माध्यमांच्या सहाय्याने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे असफल प्रयत्न चालविले आहे आणि माध्यमांनी तर्क लावण्यास सुरूवात केली. ते त्यांचा अधिकार आहे. पण लोक अभ्यास काय आहे याचा तर्क मी देतो .
कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रतिनिधित्व केले आहे त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने अनेकांनी आपले नशीब आजमावण्याचे ठरविलेले दिसत आहे त्यात स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक राजेंद्र पाटणी यांचाही समावेश आहे. पक्षाने आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मृत्यूनंतर पक्षातील जबाबदारीची ज्ञायक पाटणी यांच्या कडे सोपविली असता त्यांनी लीलया पार पाडलीत. त्यांना लाडकी बहीण योजनेच्या कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्षपद दिले. त्यांनी सुद्धा न थांबता मतदार संघात विकास कामांची भूमिपूजन केले. निधि प्राप्त करण्यात यश मिळविले. अनेक रखडलेली कामे मार्गी लावलीत, हजारो लोक सामील असणारी यशस्वी बाईक रॅली, बूथ प्रमुखांच्या सर्कल निहाय बैठका घेवुन त्यांच्यासी संपर्क केला. लोकसभा निवडणुकीत आपल्या अधिकृत उमेदवारासाठी गावो गावी जाऊन प्रचार केला जनेतेची प्रत्यक्ष संपर्क साधला. मतदार संघात नव मतदार नोंदणीचे कार्यक्रम राबविले. मतदार संघात अनेक धार्मिक आध्यात्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. मतदार संघात शेत पांदन, शिवार रस्ते स्वखर्चाने बनविले. यांच्या रस्ते बनविण्याच्या कार्यक्रमाची दखल घेत यांना पुरस्कृत कऱण्यात आले. मतदार संघात लोकांच्या सुख दुःखात सहभागी होवून प्रासंगिक भेटी दिल्यात. पाटणी साहेबांचे मतदार संघ विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठया जिद्दीने ज्ञायक पाटणी पुढे निघालेत. मतदार संघात लोकांमध्ये भारी लोकप्रियता त्यांना मिळू लागली सर्वत्र त्याचे नाव राजकीय पटलावर घेण्यात येवू लागेल. मतदासंघात लोक त्यांना मोठया आदराने बोलावू लागले त्यांचे ठीक ठिकाणी सत्कार होवू लागलेत. आज कोणत्याही गावात गेल्यास लोकांमध्ये पाटणी साहेब यांच्या रूपाने ज्ञायक यास पाहिले जात आहे. लोक प्रतिनिधीत्व करण्यास ज्ञायक योग्य असल्याचे त्यांच्यात बोलल्या जाात आहे. लोकांनी निर्धार केलेला दिसतो की यावेळी ज्ञायक आपला आमदार असेल. लोकांना आमदार ज्ञायक पाहिजे आहे या साठी व्यापक लोक सर्व्हेची सुध्दा आवश्यकता नसुन गाव पारावर नुसते जावून बसा तुमच्यात काही शंका असल्यास उत्तर मिळेल . पक्षाच्या वरिष्ठांसी असणारी त्यांची जवळीक, त्यांचे कार्य कर्तृत्व, त्यांचे नाव, लौकिक, पाटणी साहेबांचे विकास कामे आणी सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांसी अल्पावधीतच साधलेली जवळीक त्यांना उमेदवारी मिळविण्यापासून ते विजय संपादित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
0 टिप्पण्या