🌟राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचे आवाहन🌟
पुर्णा ; महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी प्रमुख काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) गटाचा आगामी विधानसभा निवडणुका अनुषंगाने रणनीती ठरविण्यासाठी व पक्षबांधणी साठी पूर्णा शहरातील सुमन मंगल कार्यालयात सोमवार दि.३० सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी दिली आहे.
पूर्णा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे,विधानसभेचे युवा नेते भरत घनदाट, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तरी पूर्णा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गंगाखेड विधानसभेतील सर्व नगरसेवक,जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,सभापती, सरपंच,ग्रा.पं.सदस्य,सेवा सह संस्थांचे चेअरमन व सदस्य, कारखाना संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे संचालक आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ऊपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई, शहराध्यक्ष प्रताप कदम, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष अशोक बोकारे,युवक तालुकाध्यक्ष गजानन कदम यांनी केले आहे....
0 टिप्पण्या