🌟उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.....!


🌟अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी🌟

परभणी (दि.03 सप्टेंबर 2024) : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. या योजनेस पात्र अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आसावा विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदयातील असावा, पदव्युत्तर अभ्यासासाठी 35 व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल, विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे  (विवाहित महिला उमेदवारांनी वडीलाकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तशी कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.)  पीएचडीसाठी 4 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो आणि पदव्युत्तर पदवीसाठी 3 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. परदेशी शिष्यवृतीच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. मुलीचे  प्रवेश  अर्ज प्राप्त न  झाल्यास मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना योजनेचा लाभ घेता येईल. पदव्युतर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा, परदेशातील प्रशिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 200 च्या आत असावी. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, वेळोवेळी शुध्दीपत्रक निर्गमित केले आहे. या योजनेंअतर्गत लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यास पुढील  सत्राचा लाभ मिळविण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणिक संस्था/ विद्यापीठाचे प्रमाणपत्र गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येकासाठी सादर करणे अनिवार्य असून, अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज डाउनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 6 सप्टेंबर, 2024 कार्यालयीन वेळ सायंकाळी 6.15 पर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3  चर्चरोड पुणे- 4110001 येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या