🌟गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असतांना अफजल पठाणने शासकीय रिव्हाल्वर मधून गोळी झाडून केली पत्नीची हत्या 🌟
नांदेड :- पत्नी सोबत टोकाचे भांडन झाल्याने संतापाच्या भरात पत्नीवर आपल्या शासकीय रिव्हाल्वर मधून गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी आयडियल कॉलनीत ऐन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व गणपती विसर्जनाच्या दिवशी नांदेड येथील धनेगाव परिसरात घडली घटनेतील आरोपी अफजल पठाण हा नांदेड शहरातील विमानतळ पोलिस स्थानकात गुन्हे शोध पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते.
या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की विमानतळ पोलिस स्थानकातील गुन्हे शोध पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पदावर कार्यरत अफजल पठाण आज मंगळवार दि.१७ सप्टेंबर रोजी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र ७७ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासह श्री गणेश विसर्जनाची धामधुम सरू असतांना सायंकाळच्या सुमारास धनेगाव येथील आयडियल कॉलनीत असलेल्या आपल्या घराकडे गेला यावेळी त्यांच्यात व त्यांच्या पत्नीत वाद झाल्याने त्याने आपल्या जवळील शासकीय बंदुकीतून गोळी मारून निर्घृण हत्या केल्याची घटना सायंकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे.
नांदेड शहरातील विमानतळ पोलीस स्थानकातील गुन्हे शोध पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याने अफजल पठाण याच्याकडे शासकीय सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होती हाती आलेल्या माहितीनुसार आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व गणपती विसर्जन असल्यामुळे नांदेड जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचारी पुर्णपणे कर्तव्य बजावण्यात व्यस्त असतांना अफजल पठाण आपल्या घरी गेले आणि आपल्या पत्नीला आपल्या शासकीय बंदुकीतून गोळी मारून ठार केले आहे.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार हे आयडीयल कॉलनीमध्ये गेले आणि अफजल पठाणच्या घरी घडलेला प्रकार पाहिला त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सध्या पोलीस अंमलदार अफजल पठाण नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात असल्याचे समजते.....
0 टिप्पण्या