🌟मंगरुळपीर येथील वाढणकर कुटुंबियांनी साकारला 'स्ञी सक्षमीकरणाबाबत संदेश' देणारा गणयाराचा देखावा....!


🌟स्त्री हे मुळात आदिशक्तीचे रूप आहे ती प्रसंगी दूर्गा बनते🌟

फुलचंद भगत

वाशिम :- यंदाचा गणेशऊत्सव हा स्ञी सक्षमीकरणाला समर्पीत करुन विविध संदेशांच्या आणी देखाव्यातील बारकाव्यामधुन महिला सबलीकरणावर भर मंगरुळपीर येथील वाढणकर कुटुंबियांनी दिला असुन यंदाचा हा सामाजिक संदेश देणारा गणरायाचा देखावा पाहण्यासाठी परिसरातुन गर्दी होत आहे.

               स्त्री हे मुळात आदिशक्तीचे रूप आहे. ती प्रसंगी दूर्गा बनते तर कधी गौरी. स्वसंरक्षणार्थ ती दुसऱ्यांवर विसंबून असते हा समस्त मानवजातीचा गैरसमज आहे. ती लढवय्यी आहेच, फक्त काळानुकाळ पुरुषी वर्चस्वाखाली दबल्या गेलेल्या स्त्रीला तिच्या आत्मभानाची ओळख करून देणारा श्रीगणेशासारखा धुरंदर सोबत हवा महिलांचे सक्षमीकरण करणे काळाची गरज आहे. समाजात वावरतांना आणि इतर व्यवसाय करतांना महिलांना अनेक समस्या जाणवतात. महिलांना खंबीरपणे व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे, त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, सर्व प्रकारचे काम सहज आणि सुलभ पद्धतीने करता आले पाहिजे आ बाबीवर प्रकाश टाकणारे संदेश देत सध्या ठिकठिकाणी महिलांवर अन्याय त्याचार होत आहे,दिवसाढवळ्या चिरहरण केल्या जात आहे.कठोर कारवाईव्दारे अशा राक्षसी वृत्तीला शासनाने ठेचुन काढायला हवे असा मोलाचा संदेश मंगरुळपीर येथील वाढणकर कुटुंबियांनी साकारलेल्या गणपतीच्या ऊत्सवानिमित्य साकारलेला आहे.हा देखावा पाहण्यासाठी परिसरातुन लोक गर्दी करत आहेत.या देखाव्यासाठी देवराव रामजी वाढणकर,कामिनाबाई वाढणकर,विलास वाढणकर,सोनल वाढणकर,रुपेश वाढणकर,अर्चना वाढणकर,संचित वाढणकर,सान्वी वाढणकर,आरुष वाढणकर आदींनी परिश्रम घेतले.......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या