🌟दिव्यांग निराधार व परितक्त्या भगिनींच्या मागण्यांसाठी काढला होता मोर्चा🌟
पुर्णा - तालुक्यातील ग्रामपंचायती द्वारे दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५% निधी दिव्यांगांच्या विकासासाठी खर्च केला जात नाही तो तात्काळ खर्च करण्यात यावा. दिव्यांग, निराधार व परितक्त्या भगिनींना घरकुलामध्ये प्राधान्य देण्यात यावे. ज्या ग्रामपंचायतींनी दिव्यांगाचा हक्काचा ५% निधी खर्च केला नाही व ज्या ग्रामपंचायतींनी घरकुलामध्ये दिव्यांग, निराधार व परितक्त्या भगिनींना प्राधान्य दिले नाही अशा ग्रामपंचायतींवर व संबंधित ग्रामसेवकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज पूर्णा येथील पंचायत समिती कार्यालयावर दिव्यांग, निराधार व परितक्त्या भगिनींचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
ग्रामपंचायत ने ५% निधी दिव्यांगांच्या विकासासाठी खर्च करावा तसेच घरकुलामध्ये दिव्यांग, निराधार व परितक्त्या महिलांना प्राधान्य द्यावे या दोन्ही बाबत शासन निर्णय असतानाही तालुका पातळीवर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत या शासन निर्णयाचे अंमलबजावणी करण्यात येत नाही या बाबत अनेक वेळा मागणी करूनही पूर्ण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अंदेलवाड हे ५% निधी व घरकुला बाबत कार्यवाही करत नाहीत यामुळे संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व दिव्यांग निराधार व परितक्त्या महिलांनी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता.
मोर्चा पंचायत समिती पूर्णा येथे पोहोचल्यानंतर गटविकास अधिकारी यांच्यासह इतर सर्व अधिकारी कार्यालय मधून पळून गेले त्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी श्री आंदेलवाड यांच्या बंद दालनासमोर ठिय्या आंदोलन केले तसेच दिव्यांग निराधार व परितक्त्या भगिनींच्या वतीने आणण्यात आलेल्या बांगड्यांचा हार आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्याच्या नामफलकाला घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त पंचायत समिती पूर्णा येथे लावला होता. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर व पंचायत समिती येथील प्रभारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर संबंधित आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, श्रीहरी इंगोले, पवन जोगदंड, विष्णू बोकारे, संजय वाघमारे, राम सुके, विठ्ठल जोगदंड, बळीराम गुंडाळे, गंगाप्रसाद वळसे, चंपत कदम, बाबन ढोणे यांच्यासह तालुक्यातील दिव्यांग, निराधार व परितक्त्या भगिनी मोठ्या प्रमाणावर मोर्चामध्ये सहभागी झाले होते....
0 टिप्पण्या