🌟नांदेड सचखंड गुरुद्वार बोर्डाच्या मालकीची जागा पेट्रोल पंपासाठी लिजवर देण्याच्या कारवाईला तात्काळ स्थगिती द्यावी...!


🌟समस्त शिख समाज बांधव व बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे गुरुद्वारा अधिक्षकास निवेदनाद्वारे साकडे🌟


नांदेड (दि.19 सप्टेंबर 2024) - नांदेड येथील पवित्र गुरु‌द्वारा सचखंड श्री हजूर साहीब अबचलनगरच्या मालकीची नांदेड शहरामध्ये मध्यवर्ती ठिक ठिकाणी मोठी मोकळी जमीन आहे.या जमीनीवर महाराष्ट्र शासनाने विविध विकास कामानिमित आरक्षित केलेली आहे. त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे अनेक उपक्रम व विकास कामे थांबलेली आहेत. शहीद भगत सिंघ रोड, अबचल नगर स्थित सिटी सर्वे नंबर 94-95 त्यामध्ये गुरु‌द्वारा सचखंड बोर्ड नांदेड द्वारा सचखंड पब्लिक स्कूलची इ‌मारत बांधकाम करण्याचे ठरले आहे. परंतु सदरील जमीन महाराष्ट्र शासनाने विविध विकास कामानिमित आरक्षित केली असल्यामुळे, सदरील शाळेची इमारतीचे बांधकाम शुरु झाले नाही हे गुरुव्दारा बोर्डाने 15 सप्टेंबर 2024 रोजी टेंडर ची जाहीर प्रगटन दिले असुन पेट्रोल पंप साठी लीज वर भाड्‌याने देण्याचा स्पष्ट केले होते गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड द्वारे याआगोदर ठराव पारित केलेला आहे की गुरु‌द्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड ची कोणतीही मोकळी जमीन, प्लॉट इत्यादि कोणासही भाडेतत्वावर देण्यात येऊ नये गुरुघरची जागा फक्त सिख समाजाच्या बेरोजगार लोकांची आणी समाजाची उन्नती करण्यासाठी वापर करण्यात यावे कारण या पुर्वी गुरुघराची खुप जमीन नांदेड शहराचा विकास कामासाठी दिली आहे आता पर्यंत दिलेल्या जमीनीचा शासनाकडुन कोणत्याही प्रकारचा मुआवजा गुरुघरास मिळाला नाही परंतु आपण हे सगळे नियमाच्या विरुध्द जाऊन गुरु‌द्वाराची मोकळी जमीन पेट्रोल पंप साठी लीज वर भाड्याने देण्याची टेंडर प्रारित करीत आहे

 गुरु‌द्वारा सचखंड बोर्ड नांदेड ची शहीद भगत सिंघ रोड, अबचल नगर स्थित सिटी सर्वे नं. 94-95 तील आरक्षित जमीन आणि इतर कोणतीही जमीन नियमाविरुध्द पेट्रोल पंप सारख्या मोठ मोठ्या व्यापारासाठी न देता सिख समाजाच्या बेरोजगार व्यक्तींना त्यांचा रोजगाराकरीता आणि एक व्यक्तीचा फायदा न बघता समाजाचा असंख्य बेरोजगार व्यक्तींचा रोजगारासाठी गुरुघराची जमीन वापरावी, दुकाने काढून गरजू लोकांना भाड्याने द्यावा या वैतिरीक्त ईतर कामासाठी गुरुघराची जागा वापरल्यास आणि गुरुद्वारा बोर्ड अधिक्षक यांच्या आदेशानुसार जे पेट्रोल पंपासाठी जाहीर प्रगटन दिले आहे ते त्वरीत रद्द करुन रद्द केलेली जाहीर प्रगटन प्रकाशीत करावी अन्यथा येणार्‍या तीन दिवसांनंतर गुरद्वारा गेट नं.01 देवढी मध्ये स्थानिक शिख समाजा बांधव व बाबा फतेहसिंघ जी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतिने आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स. मनबीरसिंघ ग्रंथी , सामाजिक कार्यकर्ते बिरेंद्रसिंघ बेदी , मनिंदरसिंघ (राज) रामगडिया, जसबीरसिंघ बुंगई, भोलासिंघ गाडीवाले, जगजीतसिंघ खालसा , जगदीपसिंघ नंबरदार,भुपेंदरसिंघ शाहु, बक्षीसिंघ पुजारी,जसबीरसिंघ हुंदल यांची उपस्थिती होती.........



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या