🌟पात्र अर्जदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी केले आहे🌟
परभणी (दि.19 सप्टेंबर 2024) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत वित्तपुरवठा करण्यात येत असून, निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, (दि.24) रोजी सकाळी 11:30 वाजता महामंडळाच्या कार्यालयात चिठ्ठ्याद्वारे (लॉटरी पद्धतीने) लाभार्थींची निवड होणार आहे. तरी संबधित पात्र अर्जदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) परभणी जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता प्रकल्प मर्यादा पाच लाख असलेली सुविधा कर्ज योजनेअंतर्गत 50 चे भौतिक 40 हजार प्रकल्प मर्यादा असलेल्या महिला समृद्धी योजने अंतर्गत 30 चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने महामंडळाच्या संकेतस्थळावर दि. 12 फेब्रुवारी ते 20 मार्च 2024 या कालावधीत जिल्हा कार्यालयात स्विकारण्यात आले होते.
सुविधा कर्ज योजने अंतर्गत एकूण 251 कर्ज प्रकरणे प्राप्त झाले असून, त्यापैकी 238 पात्र व 13 अपात्र असून पात्र अर्जदारांमधून चिठ्ठ्याद्वारे (लॉटरी पद्धतीने) लाभार्थीची निवड करावयाची आहे. महिला समृद्धी योजने अंतर्गत 46 कर्ज प्रकरणे प्राप्त झाली असून, त्यापैकी 40 पात्र तर 6 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. या पात्र अर्जदारांमधून लाभार्थी निवडण्यात येणार आहेत.......
0 टिप्पण्या