🌟असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे🌟
परभणी (दि.24 सप्टेंबर 2024) : मोटार वाहन विभाग (RTO) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या दि. 24 सप्टेंबर, 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संपात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी येथील कर्मचारी सहभागी झालेले आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी येथील कामे खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या जनतेचे कामकाज सुरळीत होण्यासाठी नियुक्त्या केलेल्या आहेत.
शासनाद्वारे परिवहन विभागातील 38 सेवा ह्या नागरिकांच्या सोयीसाठी व कार्यालयात प्रत्यक्ष न येता कामकाज होण्याकरीता फेसलेस स्वरूपात सदर सेवा सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आपणास आपल्या कामाकरता या कार्यालयात प्रत्यक्ष न येता विभागाच्या https://sarathi.parivahan.gov.in लायसन्ससाठी व https://parivahan.gov.in/parivahan वाहनासाठी या संकेतस्थळावरून अर्ज करता येतो. सदर अर्ज आपण आधार लिंक भ्रमणध्वनी क्रमांकाचा वापर करून त्यावर प्राप्त होणाऱ्या OTP क्रमांकाचा वापर करून सर्विसद्वारे अर्ज करता येतो. संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व कामकाजात विलंब होणार नाही. भविष्यात जनतेने फेसलेस सुविधेचा वापर करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे........
0 टिप्पण्या