🌟जिल्ह्यातील रहीवासी तसेच नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे🌟
फुलचंद भगत
वाशिम :- वाशिम जिल्ह्यात पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय मौसम व विज्ञान केंद्र ,नागपूर यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आहे. तरी सर्व संबधित यंत्रणांनी सजग राहावे.जिल्ह्यातील रहीवासी तसेच नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे.
जिल्ह्यात धरणाचे गेट उघडल्यास तात्काळ नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा तालुक्यात कुठेही पूर परिस्थिती उद्भवल्यास नदी काठच्या गाव स्तरावरील कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधकारक आहे. याबाबत सर्व विभाग प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचारी यांना याबाबत सुचित करावे.
पूर परिस्थितीत जे कर्मचारी कर्तव्यावर मुख्यालयी उपस्थित राहत नसतील. त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई करण्यात यावी. तसेच तालुक्यात कुठेही पूर परिस्थिती उद्भवल्यास नदी काठावरील गावातील लोकांना तात्काळ सुचित करण्यात यावे. ज्या गावात नदीच्या पुराचे पाणी शिरत असेल अशा गावातील लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात यावे.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपले मोबाईल क्रमांक २४ तास सुरू राहतील व कोणाचेही मोबाईल क्रमांक बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी त्याच प्रमाणे सर्व विभागाचे नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहतील.याबाबत स्वतः अधिकारी यांनी नियंत्रण कक्षाला भेटी देऊन कर्मचारी नियंत्रण कक्षात कर्तव्यावर उपस्थित आहे किंवा नाही याची खात्री करावी. तसेच मदत व सहकार्य लागल्यास तातडीने कळवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे........
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
0 टिप्पण्या