🌟कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष शेख सईद यांचे विभागीय उपायुक्तांना निवेदन🌟
फुलचंद भगत
वाशिम : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढून राजकारण्यांसोबत आर्थिक हितसंबंधत जपत अधिकारी काम करीत असल्यामुळे याचा फटका खर्या खुर्या बांधकाम कामगारांना बसून ते मंडळाच्या विविध लाभांपासून वंचीत राहत असल्याबाबत लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष शेख सईद शेख हमजा यांनी विभागीय उपायुक्त अमरावती यांना निवेदन देवून सदर अधिकार्यांवर कारवाई करुन खर्या खुर्या कामगारांना लाभ देण्याची मागणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम कामगारांचे नूतनीकरणाचे प्रलंबीत अर्ज व मंडळामधील विविध योजनेचे लाभाचे प्रलंबीत अर्ज हे अर्ज त्वरीत निकाली काढण्यात यावे, व बीवोसीडब्ल्यू ऍक्ट कलम 7 नुसार ज्या आस्थापना मालकांनी आस्थापना नोंद करुन बांधकाम कामगारांना नोदंणी करण्यासाठी 90 दिवसाचे प्रमाणपत्र दिले त्या सर्व आस्थापना मालकांची एक टक्का उपकराची चौकशी करण्यात यावी, व हजेरी पत्रकाची व भविष्य निर्वाह निधीची चौकशी करण्यात यावी, ज्या आस्थापना नोंदणी करणारा अधिकारी आहे त्या अधिकार्यांनी मोका तपासणी अहवाल दिला का नाही त्याची चौकशी करण्यात यावी, यासह अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतेवेळे संघटनेचे अध्यक्ष शेख सईद, उपाध्यक्ष विकास खिल्लारे, शहर संघटक वैजनाथ खडसे, पियुष शिंदे यांच्यासह अन्य कामगार उपस्थित होते.....
0 टिप्पण्या