🌟ज्या बापाने लहानपणी सर्व लाड पुरवले पैसे असोत नसोत मागेल तितके म्हणेल तेंव्हा पैसे पुरवले त्याच बापावर अशी वेळ🌟
ही घटना आहे काही दिवसापूर्वीची परळी आगाराचे वाहक गणेश राडकर लातूर-परळी बसवर कर्तव्यास होते. दुपारी 02.00 वाजता लातूरहून बस परळीकडे निघाली. यावेळी गाडीत एक आजोबा येऊन बसले. गाडी काही अंतरावर गेल्यानंतर राडकर यांनी तिकीट काढायला सुरुवात केली. त्या आजोबांना तिकिटाचे पैसे मागितले, यावेळी त्यांनी हाफ तिकिटं सांगत 55 रुपये हातावर टेकवले, आणखी 5 रुपये द्या असं राडकर त्यांना बोलले. तिकीट तर 55 रुपये असताना 60 कसे असं त्या आजोबानी विचारले.
यावेळी त्यांना 'बाबा तिकीट वाढल्याचे' सांगितले. यावेळी त्यांनी खिशात हात घालून पाहणी केली पण पैसे नसल्याने त्यांनी 'मुलाने एवढेच पैसे खर्चीसाठी दिल्याचे सांगितले' , हे सांगताना त्या आजोबाच्या नजरेत एक प्रकारची हताशा होती. ती हताश आणि चेहऱ्यावरची हतबलता , डोळ्याततराळणारे पाणी वाहक राडकर यांना अस्वस्थ करून गेली आणि त्यांनी या घटनेचा उल्लेख करून 'खरं तर एवढ्या उन्हात प्रवास करताना तहान, भूक लागू शकते असं विचार न करता केवळ 55 रुपये बापाच्या हातावर टेकवणाऱ्या मुलाचा विचार सतत मनात घोळत होता. तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही पण मुलांनो, बापाचे मालक होऊ कधी नका' असा सल्ला देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली.
आज आपण मोठे झालो.आपल्याकडे वडिलांनी व्यवहार दिला तर आपण बापालाच मोजके पैसे द्यावेत ? ज्या बापाने लहानपणी सर्व लाड पुरवले, पैसे असोत नसोत मागेल तितके म्हणेल तेंव्हा पैसे पुरवले त्याच बापावर आज अशी वेळ... मोजून तिकीटा एवढेच पैसे ...? तहान, भुख लागू शकते अशा वेळेस त्यांनी काय करावे...कोणाला मागावे..? 5 रू माझ्यासाठी मोठी रक्कम नव्हती , मी ती भरली पण अशी परिस्थिती पाहून खूप वाईट वाटले. गाडी लातूरवरून परळीला आली पण माझ्या मनात ती गोष्ट सारखी सलत होती म्हणूनच मित्रानो कोणीच बापाचे मालक होवू नका, त्यांना मागितल्यापेक्षा जास्त पैसे द्या अशी भावना मी सोशल मीडियावर व्यक्त केली.
लेखक: अनामिक - व्हॉट्सअपवर आलेली पोस्ट
फोटो साभार : गुगल
धन्यवाद साभार : आधी माणूस म्हणून जगा
0 टिप्पण्या