🌟सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयाच्या शेतीशाळेचा तिसरा वर्ग किड रोग नियंत्रण कार्यशाळेत बोलतांना ते म्हणाले🌟
परभणी : परभणी तालुक्यातील मौजे संबर येथे दि.04 सप्टेंबर 2024 रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नियमक मंडळ अध्यक्ष रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी, कृषी सहसंचालक लातूर साहेबराव दिवेकर,प्रकल्प संचालक आत्मा परभणी तथा जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी परभणी दौलत चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे,उप प्रकल्प संचालक आत्मा परभणी प्रभाकर बनसावडे,तालुका कृषी अधिकारी परभणी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी स्वाती घोडके यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयाच्या शेतीशाळेचा तिसरा वर्ग कीड रोग नियंत्रण हा घेतला, या शेती शाळेचे मार्गदर्शक म्हणून राजीव गांधी कृषी महाविद्यालय परभणी येथील प्राध्यापक लक्ष्मण धस कीटकशास्त्रज्ञ यांनी सोयाबीन वरील सर्व किडींची ओळख व व्यवस्थापन व मित्र कीटकांची ओळख याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी आणि सेफ्टी किट घालून फवारणी कशी करायची याबाबत प्रात्यक्षिक तसेच सोयाबीन वरील सर्व किडींची ओळख होण्यासाठी महिलांना किडींचे चित्र असलेले एप्रोन परिधान करून त्या महिलांना वेगवेगळ्या किडींचे नाव देऊन बाकी महिलांना सर्व किडींची ओळख पटवून दिली शेतीशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सविता बोबडे,संगीता चव्हाण,विक्रम चव्हाण नारायण चव्हाण या सर्वांनी सहकार्य केले.....
0 टिप्पण्या