🌟यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती🌟
पुर्णा :- पुर्णा येथील श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयांमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन याचे औचित्य साधून तत्त्वज्ञान विभागाद्वारे डॉ.राधाकृष्णन या भित्तिपत्रकाचे विमोचन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे सचिव अमृत राज कदम सहसचिव गोविंदराव कदम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार उपप्राचार्य डॉ.गजानन कुरुंदकर व डॉ.शिवसांब कापसे लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.पी.व्ही.भुताळे व प्राध्यापक फातिमा शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.राधाकृष्णन यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान व त्यांचा जीवन परिचय यावर प्रकाश टाकण्यात आला सदरील भित्तिपत्रकामध्ये बी.ए प्रथम वर्ष आणि बी.ए द्वितीय वर्ष व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यांची नावे मोनिका वाघमारे ,वनिता थोरात ,मुस्कान शहा ,सीमा वाघमारे ,रत्नदीप राजभोज, शुभांगी सोलव ,गीता सोलव, वैष्णवी सोलव ,मयुरी सोलव, सदरील भितीपत्रकाचे मार्गदर्शन डॉ.व्ही.ओ.आंबटकर.डॉ.मीरा शेळके यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ.रेखा पाटील डॉ.वर्षा धुतमल डॉ .दिशा मोरे डॉ. स्मिता जमधाडे यांची उपस्थिती होती .सदरील विद्यार्थ्यांचे तत्त्वज्ञान विभागाने आणि प्राचार्यांनी अभिनंदन केले....
0 टिप्पण्या