🌟परभणी तालुक्यातील हिंगला गावात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न🌟
परभणी - परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परभणी तालुक्यातील हिंगला या गावी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये हिंगला गावातील नागरिकांची सर्व रोगांबाबत आरोग्य तपासणी करण्यात आली व तपासणीमध्ये आजार आढळून आलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला.
त्याचबरोबर या आरोग्य तपासणी शिबिरात गावकऱ्यांची रक्त तपासणी, मधुमेह तपासणी व रक्तदाब तपासणी देखील मोफत करण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबिरास गावकर यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या शिबिराचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग यांनी केले होते.
आरोग्य शिबिरास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख उद्धव गरुड, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, सरपंच ज्ञानेश्वर अब्दागिरे, उपसरपंच रमेश गोल्डे, पोलीस पाटील पंकज सोनकांबळे, विष्णू गोल्डे, माऊली गरुड, संतोष गरुड, ज्ञानेश्वर भोंग, गणेशराव बल्लाळ, बालाजी भोंग, बाळासाहेब अब्दागिरे, बाळू झोडपे, नितीन सोनकांबळे, पुरभाजी सोनकांबळे, पांडुरंग बल्लाळ, राजेंद्र भोंग, किशनराव अब्दागिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.......
0 टिप्पण्या