🌟तांत्रिक ॲप्रेंटीस,कंत्राटी कामगार असोसिएशनच्या पाठपुरावा व विविध आंदोलनास यश🌟
नागपूर :- महावितरण,महापारेषण, महानिर्मिती कंपनी मध्ये ४२ हजाराच्या वर कंत्राटी कामगार आहेत. कंत्राटी कामगार हा वीज निर्मिती पाहून वीज वहण तसेच वीज वितरणाचे काम प्रतिकूल परिस्थितीत करीत आहे. कंत्राटी कामगारांनी कोरोना काळा मध्ये जनतेची सेवा केली आहे. कोविड काळ असो,वादळ असो, बिल वसुली असो, कंपनीवर इतर कोणतेही संकट असो हा कंत्राटी कामगार सह्याद्री प्रमाणे धाडसाने उभा राहत असताना त्यांचा कष्टाचे श्रमाचा व मोबदला मिळाला पाहिजे.
याकरिता तांत्रिक अप्रेंटिस, कंत्राटी कामगार असोसिएशन ने पगार वाढ व इतर प्रश्नाकरिता राज्यव्यापी विविध आंदोलन पुकारले होते त्या आंदोलनाला यश प्राप्त झाले असून महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी.दि.०९ सप्टेंबर २०२४ रोजी कंत्राटी कामगारांच्या पगारामध्ये १९ टक्के वाढ करण्यात आली. अशी माहिती तांत्रिक ॲप्रेंटिस , कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी केली आहे.....
0 टिप्पण्या