🌟परभणी येथील गंगाखेड रस्त्यावरील शेडमध्ये अंदर-बाहर जूगार खेळणारे ०८ जुगारडे पोलिसांच्या ताब्यात तर १४ फरार....!


🌟स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची धाडसी कारवाई : एकूण ०६ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात🌟


परभणी (दि.०५ सप्टेंबर २०२४) : परभणी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने गंगाखेड रस्त्यावरील एका शेडमध्ये अंदर-बाहर नावाचा जूगार खेळणार्‍या जुगारड्यांच्या एका टोळक्यास ताब्यात घेवून तब्बल ०६ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

               पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड,राजू मुत्तेपोड,मोहन लाड,हुसेन पठाण, इंद्रजितसिंह बावरी, निलेश परसाडे आदींच्या एका पथकाने माहिती कळाल्याबरोबर गंगाखेड रस्त्यावरील एका हॉटेलच्या बाजूच्या शेडमधून जूगार खेळणार्‍या एकूण ०८ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८२ हजार रुपये रोख, दहा वाहने,१४ मोबाईल असे एकूण ०६ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यावेळी घटनास्थळावरुन अन्य काही व्यक्ती पळून गेल्या. त्यात सहा मोबाईल व आठ मोटारसायकल सोडून पळालेल्या १४ जणांविरोधातही तसेच जागा मालक व अन्य एकूण २४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या