🌟संविधान मंदिराच्या उद्घाटना निमित्त ‘आयटीआय’ येथे विविध स्पर्धेचे आयोजन.....!


🌟मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून 434 शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची स्थापना🌟

परभणी (दि.13 सप्टेंबर 2024) : सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून 434 शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.

            संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते रविवारी (दि.15) आभासी पद्धतीने होणार आहे. या अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे दि. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये विशेषत उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार आणि कर्तव्याबदल जागृती वाढवणे, घटनात्मक समस्या दुरुस्त्या समकालीन समाजातील घटनेची भूमिका यासारख्या विषयातील जागरुकता, विद्यार्थ्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार समजून घेण्यास किंवा त्याचा वापर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना कायदेशीर सहाय्य आणि समर्थन प्रदान करणे राज्यघटनेचे सखोल आकलन व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संविधानाच्या विविध पैलूवर पुस्तके लेख इत्यादी गोष्टी उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी प्राचार्य विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून, नागरिकांनी आयोजित स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांनी केले आहे.......

            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या