🌟परभणी जिल्ह्यात विशेष वैद्यकीय कक्षामार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन....‌!


🌟त्याबाबत आज जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नागेश लखमवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न🌟 

परभणी (दि.27 सप्टेंबर 2024) : परभणी जिल्ह्यात राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाअंतर्गत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, त्याबाबत आज जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नागेश लखमवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  

यावेळी सहाय्यक शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, अपर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, समन्वयक डॉ. अजित विसपुते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक डॉ. सिध्दार्थ पैठणे, महात्मा फुले जन आरोग्य विभागाचे समन्वयक डॉ. संदिप गाडेकर उपस्थित होते.

दि. 1 ते 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिराच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. या दरम्यान वाडीवस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबीरामध्ये जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य विभाग, आरोग्य विद्यापीठ संलग्न शासकीय तथा खाजगी रुग्णालय, सार्वजनीक आरोग्य विभाग, यांचा  समावेश राहणार आहे. शिबीर नोडल अधिकारी डॉ. ए. आर. तांबोळी, धर्मादाय कार्यालयाचे अधीक्षक श्री. अ. रा. राजेस्लुवार, श्री. पी. एम. तौर, श्री. पी. ए. पाटील, डॉ. प्रफुल्ल पाटील, धर्मादाय दंत रुग्णालय व महाविद्यालय परभणी तसेच एचएलएल टीम प्रतिनिधी, एसटीईएमआय प्रतिनिधी उपस्थित होते.....

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या