🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक माहिती अधिकार दिवस साजरा🌟
परभणी (दि.27 सप्टेंबर 2024) : सर्वसामान्य नागरिकांना सरकार दरबारी सुरु असलेल्या विविध बाबींची माहिती व्हावी, हे माहिती करून घेण्याचा अधिकार मिळाला असून, त्याचे महत्त्व सर्वांना कळावे. त्यांना ती माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे जनमाहिती अधिकाऱ्यांनी विहीत कालमर्यादेत माहिती पुरवावी असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, अपर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, मिलींद शिनगारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे जन माहिती अधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सर्व क्षेत्रात माहिती अधिकार अधिनियमामुळे पारदर्शकता आली असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या अधिकारातून त्यांना हवी ती माहिती उपलब्ध होत आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीतून पारदर्शकता व उत्तरदायित्व तसेच खुल्या शासन व्यवस्थेसाठीची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनीही उपस्थितांना यावेळी माहितीचा अधिकार अधिनियम आणि विहित कालमर्यादेत करावयाच्या कार्यवाहीबाबत समयोचित सविस्तर मार्गदर्शन केले.....
*-*-*-*-*-*
0 टिप्पण्या