🌟यावेळी संचालक संचालिका यांचा संपत्नीक सत्कार करण्यात आला🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पत संस्था, चिखली ची 21 वी आमसभेत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथील निराधारांच्या सेवे करिता पाच हजार रुपये आर्थिक मदत देऊन संचालक संचालिका यांचा संपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यकम चे अध्यक्ष श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पत संस्थे चे अध्यक्ष दिपक देशमाने तर विशेष उपस्थिती व मार्गदर्शक माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमेटी बुलडाणा राहुल बोन्द्रे तर प्रमुख उपस्थिती मध्ये बाजार समिती चे सभापती नंदकिशोर सवडतकर, माजी नगरध्यक्ष कुणाल बोन्द्रे, माजी नगरसेवक प्रा डॉ निलेश गावंडे, शिवसेना शहर प्रमुख श्रीराम झोरे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ इसरार, डॉ सत्येंद्र भुसारी, प्रा डॉ राजू गवई, प्रकाश निकाळजे, अतरुद्दीन काझी, ऍड सूर्यकांत मेहेत्रे, काँग्रेस तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, मुरलीधर अग्रवाल यांच्या सह इतर होते.
यावेळी संस्थेच्या वतीने ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, सुलोचना माहेर घर (महिला आश्रम) व लताई बाल अनाथालंय भोकर ता चिखली जिल्हा बुलडाणा येथे गेल्या दोन वर्षांपासून निराधार बेसहारा, बेघर, घरातून काढून दिलेले व ज्यांना सर्व जवळचे नातेवाईक असून सुद्धा त्यांच्या सांभाळ करू शकत नाही असे वयोवृद्ध आजी आजोबा तसेच विधवा, घटस्फोटीत, परीतक्ता निराधार महिला व त्यांचे बालक किंवा अनाथ बालके यांचे राहणे, नास्ता, जेवण, कपडे, दवाखाना व औषध उपचार इत्यादी सर्व अत्यावश्यक सेवा मोफत देत आहे. गेल्या दोन वर्षात 38 वयोवृद्ध आजी आजोबा, 5 निराधार महिला व 2 बालके यांचे व्यवस्थित रित्या संगोपन करण्यात आलेले आहे. तसेच आज रोजी मानव सेवा प्रकल्प मध्ये एकूण 9 वयोवृद्ध आजी आजोबा आहेत. इतरांना त्यांचे नातेवाईक परत घर वापसी करून घेऊन गेले तर काही स्वतः हुन गेले आहेत. या सामाजिक कार्यात प्रशांत अविनाश डोंगरदिवे संचालक,
सौं रुपाली प्रशांत डोंगरदिवे संचालिका यांचे योगदान पाहून यांच्या कार्याची दाखल संस्थेने घेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुपये पाच हजार देऊन आर्थिक मदत केली तर सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच यांच्या कडे कोणीच कर्मचारी नाही ते दोघे पती पत्नी सर्व निराधार लोकांना सर्व प्रकारे मोफत सेवा देत असल्यामुळे जे दानवीर आहेत त्यांनी स्व इच्छे ने येऊन मदत करावी जेणेकरून हे दोघे हि मानव सेवा करू शकतील असे भावनिक आवाहन मुंगसाजी पत संस्थेचे अध्यक्ष दिपक देशमाने यांनी केले. वृद्धाश्रमाला आर्थिक मदत व मानसन्मान केल्याबद्दल वृद्धाश्रमाच्या वतीने संचालक यांनी श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पत संस्थेच्या परिवाराचे आभार व्यक्त केले.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या