🌟राजे गणेश मित्र मंडळ आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात १५० नागरीकांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार🌟
परभणी (दि.१६ सप्टेंबर २०२४) : परभणी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम मुदिराज व राजे गणेश मित्र मंडळाच्या वतीने परभणी शहरातील पार्वती नगरात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या आरोग्य तपासणी शिबिरात १५० नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्याच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनत पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अस्थिरोगतज्ञ डॉ.केदार खटींग,माजी नगरसेवक रितेश झांबड, भाजपा अनु.जाती प्रदेश उपाध्यक्षा रमा शेजावळे यांची उपस्थिती होती. डॉ. निलेश पवार, डॉ. कपिल पाटील, डॉ. संदिप मोरे डॉ. गितांजली मोरे या तज्ञ डॉक्टरांनी यावेळी रुग्णांची तपासणी केली.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय डहाळे, सूरज पवार, मंडळाचे अध्यक्ष मनोज वाठोर, सुशांत शिंदे, संकेत अस्वार, देवदास काळे, व्यंकटेश राठोड, रितेश सरपते, आकाश डौंड, ऋषिकेश मते, चंदू शिंदे, बालाजी मुदिराज, माधव शिंदे, तेजस मुदिराज, वरद रोडगे, अनंता गिरी, राज निलावर, अमोल वाकळे, महेश सोळंके, गणेश ताल्डे, मंगेश बोरकर, सोनु कांबळे आदींनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या