🌟मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले🌟
परभणी :- गोदावरी नदीला अचानक आलेल्या पुरात नदीपात्रात सोडलेले जाळे होडी व मासे पकडण्याचे अन्य साहित्य वाहून गेल्याने मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून गंगाखेड तालुक्यातील मच्छीमारांना आर्थिक मदत देण्याची मागणी मच्छिमार बांधवांच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी तहसीलदार माननीय उषा किरण शृंगारे मॅडम यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे.
आठवडा भरापूर्वी 31 ऑगस्ट ते २ सप्टेंबर रोजी गंगाखेड तालुक्यात सर्व दूरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात तालुक्यातील मैराळसावंगी चिंचटाकळी, महातपुरी, खळी, दुसलगाव, गंगाखेड, मसला, नागठाणा व झोला आदी गावातील भोई समाज बांधवांचे मच्छीमारांसाठी नदीपात्रात सोडलेले जाळे होडी व अन्य साहित्य वाहून गेल्याने मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय परभणी माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी तसेच माननीय तहसीलदार मॅडम यांच्या आदेशान्वये मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले.
यावेळी दुसलगांव सोसायटी चे चेअरमन श्री.विठ्ठल भुंगासे पोलीस पाटील दुसलगांव सौ.संगिता कचरे,आश्रोबा कचरे विठ्ठल इंद्रोखे, नामदेव कचरे, माणिक कचरे, विठ्ठल कचरे,भरत कचरे, कृष्णा बिजले,लहू कचरे, कृष्णा कचरे, नागनाथ कचरे, नवनाथ कचरे,चुडीराम कचरे सौ.मुक्ताबाई बिजले इत्यादी मच्छीमार उपस्थित होते......
0 टिप्पण्या