🌟जिल्हास्तरावरील कुस्ती स्पर्धेत तेजस्वीनी हालगे,आरती एडके,मारोती जळबाजी रोडगेनी मारली बाजी🌟
परभणी/पुर्णा :- परभणी येथे महाराष्ट्र राज्य युवक व क्रिडा सेवा संचालनालय पुणे व परभणी जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कुस्तीस्पर्धेत पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून शाळेला विजय प्राप्त करून दिला.
परभणी येथे काल मंगळवार दि.२४ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्तीस्पर्धेत (०१) कु.तेजस्वीनी कैलास हालगे १४ वर्षे वयोगटात ४२ किलो वजन.(०२)आरती निवृत्तीनाथ एडके १४ वर्षे वयोगट ४८ किलो वजन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्तीस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ग्रामीण भागातील शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला तसेच(०३)मारोती जळबाजी रोडगे या मोठ्या गटातील विद्यार्थ्यांने कुस्तीस्पर्धेत जिल्हास्तरावर सर्व द्वितीय क्रमांक पटकावून शाळेला घवघवीत यश मिळऊन दिले.
उपरोक्त तीन्ही विद्यार्थ्यांची विभागीय कुस्तीस्पर्धेसाठी निवड झाली असून विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रौदंळे,सचिव दशरथ साखरे,संस्थेचे सर्व संचालक मंडळ,शाळेचे मुख्याध्यापक डी.सी.डुकरे,जेष्ठ शिक्षक बी.एन.बेद्रे,मार्गदर्शक शिक्षक आजीम पठाण,विद्यार्थ्यांसोबतचे शिक्षक रतन साखरे,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे......
0 टिप्पण्या