🌟उपासक उपासिकांनी स्वतः धम्म संस्कार ग्रहण करून आपल्या मुलांना व नातेवाईकांनावर संस्कार केले पाहिजे🌟
पुर्णा :- भविष्यात धम्म संस्कार ही काळाची गरज ओळखून प्रत्येक गावात पुर्णा शहर प्रमाणे धम्म संस्कार केंद्र निर्माण होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आज पुर्णेत दोन दिवसीय बौध्द धम्म संस्कार शिबीरात केले.
पूर्णा शहरात आज धम्म संस्कार शिबीरात भन्ते उपाली थेरो भदंत उपगुप्त महाथेरो भन्तेजीचा सहवास लाभला आहे पुढे उपदेश करतांना महाविरो म्हणाले की धम्म संस्कार ही काळाची गरज आहे उपासक उपासिकांनी स्वतः धम्म संस्कार ग्रहण करून आपल्या मुलांना व नातेवाईकांनावर संस्कार केले पाहिजे बुद्ध धम्म संघाचा आदर केला पाहिजे ,त्रिशरण पंचशिल समजावून घेऊन त्याचे आचरण केले पाहिजे धम्मगुरूचा आदर केला पाहिजे उपासकांचा उपासिकांचा संघ निर्माण केल पाहिजे विवेकी समाज निर्माण करण्यासाठी जागृती केली पाहिजे ,धम्म सिंचन करणारे बना अष्ठशिल पारमिता उपोसथाचे पालन करा मनातील मलिनता दुर केल्या शिवाय सुख मिळणार नाही त्यासाठी मनातील विकार दुर करा असा धम्म उपदेश यावेळी दिला उपासक उपासिकांनी शिबिरामध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.
पूर्णा शहरात धम्म चळवळ संपूर्ण मराठवाडा नव्हेतर महाराष्ट्र तील धम्म चळवळ केंद्र म्हणून पूर्णा शहराची ओळख आहे पूर्णेच्या विहाराची धम्मचळवळीचे प्रेरणा घेऊन इतर ठिकाणी धम्म रुजत असल्याने पूर्णेचे बुद्ध विहार धम्म चळवळीचे केंद्र आहे असे ते यावेळी म्हाणाले,असल्याचा धम्म उपदेश भदंत महाविरो काळेगाव अहमदपूर यांनी दिला पूर्णा येथील बुद्ध विहारात दोन दिवशीय धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या सत्रात भबुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या नंतर त्रिशरण पंचशिल बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली सदरील शिबीर मुख्य आयोजक भदंत डाॅ.उपगुप्त महाथरो ,कार्याध्यक्ष [अ.भारतीय भिख्खू संघ] भदंत पय्यावंश याचां संयोजनां खाली सुरु आहे यावेळी ,शामराव जोगदंड ,विजय बगाटे पी जी रणवीर ,अमृत मोरे, दिलीप गायकवाड, अमृत कऱ्हाळे अशोक धाबाले, सुरेश मगरे , प्रा.प्रदीप कदम, माधव मोहिते बाळासाहेब कुऱ्हे,एम .यु.खंदारे, अमृत कऱ्हाळे ,आदि उपस्थित होते. शिबिराचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा.श्रीकांत हिवाळे यानीं केले......
0 टिप्पण्या