🌟विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या प्रशिक्षणास गैरहजर : 117 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा...!


🌟परभणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची माहिती🌟

परभणी (दि.26 आक्टोंबर 2024) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याबद्दल 117 अधिकारी/कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार आहेत अशी माहिती परभणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली.

              वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सभागृहात शनिवार दि.26 आक्टोंबर रोजी आयोजित केलेल्या प्रशिक्षणास पहिल्या सत्रात 560 पैकी 492 अधिकारी कर्मचारी हजर होते. एकूण 68 जण गैरहजर होते. दुपारच्या सत्रातसुध्दा 484 पैकी 438 अधिकारी-कर्मचारी हजर होते तर 49 जणांनी प्रशिक्षणास दांडी मारली. वास्तविकतः ईव्हीएम, व्हिव्हीपॅट मशीन व इतर आवश्यक बाबींसाठी हे प्रशिक्षण गरजेचे होते. परंतु, त्याकडे या 117 अधिकारी-कर्मचार्‍यांनी पाठ फिरवली, असे शेवाळे यांनी म्हटले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या