🌟परभणी जिल्हा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : 3 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल.....!


🌟उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय🌟 

परभणी (दि.22 आक्टोंबर 2024) :- आज मंगळवार, दि 22 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे- 

1) 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ - 18 उमेदवारांनी  35 अर्ज घेतले. तर  दिनकर धारोजी गायकवाड यांनी बहुजन रिपब्लीकन सोशलीस्ट पार्टीच्यावतीने  नामनिर्देशन पत्र दाखल केले. 

2) 96- परभणी विधानसभा मतदारसंघ - 21 उमेदवारांनी  30 अर्ज घेतले. तर अ.पाशा अ.गफ्फार खुरेशी यांनी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्यावतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले. 

3) 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ - 17 उमेदवारांनी 27 अर्ज घेतले.

4) 98- पाथरी विधानसभा मतदारसंघ - 18 उमेदवारांनी  52 अर्ज घेतले तर अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. 

(संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या