🌟नांदेड येथे माता साहेब देवाजी यांच्या 343 व्या जन्मोत्सवाचे मित ग्रंथी भाई गुरमीतसिंघजी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न....!


🌟माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवा निमित्त उद्या मंगळवार दि.15 आक्टोंबर रोजी नेजाबाजीच्या कवायतींचे उद्घाटन🌟 


नांदेड  : नांदेड जिल्ह्यातल्या मुगट परिसरातील गुरुद्वारा मातासाहेब येथे माता साहेब देवाजी यांच्या 343 व्या जन्मोत्सवाचे उद्घाटन गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेबचे मित ग्रंथी भाई गुरमीतसिंघजी यांच्या हस्ते सोमवारी सकाळी 11 वाजता पार पडले. यावेळी गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुखी संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवा वाले आणी मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, मातासाहेब गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी, बाबा दियालसिंघजी बूढा दल, बाबा गुरसेवकसिंघजी मुखतियारे आम, बाबा लखवीरसिंघजी मोहाली, बाबा मेलासिंघजी प्रचारक, बाबा मेहरसिंघजी नबीलाबाद यांची मुख्य उपस्थिती होती


माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवानिम्मित मोठ्या संख्येत भाविक उपस्थित झाले आहेत. सकाळी सुशोभित दिवान हाल मध्ये सर्व प्रथम श्री गुरु ग्रन्थसाहेब यांचे पाठ प्रारंभ करण्यात आले. तसेच कीर्तन आणी अरदास करण्यात आली. तख्त सचखंड येथील हजूरी रागी भाई जरनैल सिंघजी नूर यांच्यावतीने कीर्तन करण्यात आले. तसेच भाई बलविंदर सिंघ रंगीला, भाई हरज्योत सिंघ जख्मी, भाई हरजीतसिंघ आणी भाई सेवकसिंघ यांच्या वतीने कीर्तन करण्यात आले. 

जन्मोत्सव निमित माता साहेब येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पशु संवर्धन विभाग यांचे पथक पाचारित करण्यात आले आहे. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जन्मोत्सव संचालनात बाबा बिल्ला जी, गुरमीतसिंघ बेदी, राजसिंघ रामगडिया, गुलाबसिंघ असर्जनवाले, राजेंद्रसिंघ पुजारी, मनप्रीतसिंघ कुंजीवाले आणि सेवाभावी व्यक्तिचे सहकार्य लाभत आहे. 

मंगळवारी दुपारी 3 वाजता माता साहेब गुरुद्वारा समोर नेजाबाजी कार्यक्रम होणार आहे. तीन दिवसीय या कार्यक्रमाचे समारोप बुधवारी दुपारी होणार आहे. 

.......

गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहिब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणी सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांनी दुपारी गुरुद्वारा माता साहेब येथे पोहचून दर्शन घेतले. तसेच दिवान हाल येथे सुरु असलेल्या माता साहेब जन्मोत्सव कार्यक्रमास हजेरी लावली. 

......

भव्य लंगर प्रसाद : माता साहेब जन्मोत्सव निमित्त भव्य लंगर प्रसाद कार्यक्रम सुरु करण्यात आले आहे. विशेष करून ब्रेड पकौडे लंगर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या