🌟जिंतूर तालुका कृषी अधिकारी,कृषी सुपरवायझर सह पोलीस निरीक्षक यांनी उपोषण सोडवले 🌟.
परभणी (दि.१० आक्टोंबर २०२४) दिनांक ०३/१०/२०२४ पासून दुधगाव महसूल मंडळातील आसेगाव या गावात इरशाद पाशा चाँद पाशा यांचे NDRF SDRF च्या निकषानुसार मदत देण्यात यावी, जाचक आटी रद्द करून १००% पिक विमा देण्यात यावा, सोयाबीन ७,००० कापसाला १२,००० हजार हमीभाव देण्यात यावा, खरीप २०२१ व २०२३ खरीप व रब्बी मध्ये वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा, करपरा नदीवरील बंधारा ना दुरुस्त आहे दुरुस्त करण्यात यावा, करपरा नदी खोलीकरण सरळीकरण रुंदीकरण करण्यात यावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे तर कर्ज मुक्ती करण्यात यावी या सह विविध मागण्याकरीता अमरण उपोषण चालू होते. दिनांक ०९/१०/२०२४ रोजी संध्याकाळी ७ ०० वाजता मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्या मध्यस्थीने त्यांचे शिष्टमंडळ पाठविले वरील मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून त्यांच्या स्तरावरील मागण्या लिखित स्वरूपात मान्य करण्यात आले. त्यांच्या स्तरावरील कार्यवाही सुरू झालेली आसून वरिष्ठ स्तरावरील मागण्यांबाबत पत्रव्यवहार करण्यात येईल आसे आश्वासन देण्यात आले. या आश्वासना नंतर इर्शाद पाशा चांद पाशा यांना नार्यल पाणी पाजवून मा. तहसीलदार जिंतूर, मा.ता. कृषी आधीकारी, जिंतूर मंडळधिकारी, कृषी सुपरवायझर सह पोलीस निरीक्षक यांनी उपोषण सोडवले.
शेतकऱ्यांनी या अंदोलनात सहभाग घेतला होता त्यात आसेगाव येथील शेतकरी पांडुरंग लक्ष्मणराव पवार, मधुकर रावसाहेब पवार, विश्वंभर तुकाराम पवार, प्रदीप प्रल्हादराव पवार, मदन नामदेवराव पवार, शिवाजी नाना पवार, राजाभाऊ रामराव घोळवे, दत्तराव व्यंकटराव काटकर, प्रकाश नामदेवराव जव्हार, अशोक शंकरराव पवार, प्रल्हाद गुलाबराव पवार, बळीराम धोंडीराम पवार, बाळू काका देविदास पवार, दिना बाळासाहेब पवार, सुशील करेवार, देवेंद्र करेवार, सुधाकर करेवार, पंजाब सुधाकर पवार, अंबादास उमाजी पवार, दत्तराव दौलतराव घोळवे, शेख अहमद भाई, भगवान रंगनाथ पवार, निरंजन सुधाकर पवार, अच्युत ज्ञानदेव पवार, ऋषिकेश रामप्रसाद पवार, बालाजी शिवाजी घोळवे, श्रीपत भैय्या पवार, नितीन मधुकर पवार, गोपाळ भास्कर पवार, रामा विलास पवार, दीपक माणिकराव पवार, शंकर उद्धव फिसफीसे, कल्याण बापूराव पवार, गोपाळ भगवान घोळवे, पंकज काटकर, दत्ता संजय पवार, प्रसाद लोडीबा गिराम, नवनाथ साखरे, आप्पा साखरे, अनिल साखरे, लकी पुंड, कृष्णा देशमुख, सुदर्शन पवार व तसेच दुधगाव महसूल मंडळातील, दुधगाव, कौडगाव, सोन्ना, आसेगाव, वस्सा, लिंबाळा, रेपा, नागणगाव, बोर्डी, डोहरा मुडा, देवगाव, धानोरा, माक शेक कोक, करवली, पिंपरी, कसर सह पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांचे आंदोलनात योगदान आहे. या मागण्याबाबत शिष्टमंडळातील मा. तहसीलदार जिंतूर, मा. तालुका कृषीअधिकारी, यांनी वरील मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून, त्यांच्या, स्तरावरील मागण्या लिखित स्वरूपात मान्य झाले आहे. त्यांच्या स्तरावरील कार्यवाही सुरू झालेली आहे आणि वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात येईल आसे आश्वासन देण्यात आले आहे......
0 टिप्पण्या