🌟गंगाखेडच्या सुसज्ज भाजी मंडईस संत सावता माळी यांचे नाव द्या......!


🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचेकडे गोविंद यादव यांची मागणी🌟 

गंगाखेड : आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा पुढाकार आणि संकल्पनेतून गंगाखेड शहरात सर्व सोयींनी युक्त भाजी मंडई ऊभारली जात आहे. या कामाचा  भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. याच कार्यक्रमात सदर भाजी मंडईस माळी समाजाचे कर्मयोगी संत शिरोमणी सावता माळी यांचे नाव द्यावे, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली.


आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते आणि उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक जिवराज डापकर, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, जेष्ठ नेते किशनराव भोसले, व्यापारी सुभाषसेठ नळदकर, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद झोलकर, ॲड. संदीप अळनुरे पाटील, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, मित्रमंडळ शहराध्यक्ष ॲड सय्यद अकबर, सत्यपाल साळवे, ॲड सय्यद कलीम, प्रा. पिराजी कांबळे, इक्बाल चाऊस आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. 

या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विविध विकासकामांची माहिती देत विकासाचे हे चक्र भविष्यात अधिक वेगाने चालवण्याचा विश्वास व्यक्त केला. तर गोविंद यादव यांनी सदरील प्रस्तावित भाजी मंडईचे नामकरण ‘फुले मंडई ‘ न करता ती संत सावता माळी यांच्या नावाने ओळखली जावी, अशी भावना व्यक्त केली. मोठ्या शहरांत फुले यांच्याच नावाने मंडया ओळखल्या जातात. परंतू महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य भाजीपाला विक्रिपेक्षा कितीतरी जास्तीचे आहे. म्हणून गंगाखेडच्या मंडईस संत सावतामाळी यांचे नाव जास्त समर्पक राहील, अशी भूमिका यादव यांनी मांडली. आ. डॉ. गुट्टे व प्रशासक डापकर यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदुदेव जोशी यांनी केले. कार्यक्रमास भाजी विक्रेते, व्यापारी यांची मोठी ऊपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या