🌟खासदार जाधव यांची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे तक्रारद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी🌟
परभणी : राज्यात सर्वत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असतांना परभणी येथील परभणी-पाथरी रस्त्यावर गुरुवार दि.१७ आक्टोंबर २०२४ रोजी रात्री ०७.३० वाजेच्या सुमारास नोंदणीकृत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूसंच व सुरक्षा संचाचे वितरण केले जात असल्याचे खा.संजय उर्फ बंडू जाधव यांना कळाले सदरील प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याने संबंधितांविरोधात आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.
संकल्प मल्टिसर्व्हिसेसमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना गृहउपयोगी साहित्य संचाचे वाटप सुरु होते. त्यावेळी खासदार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली, तो प्रकार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकारा विरोधात संबंधितांविरुध्द कारवाई करावी अशी मागणीही खासदार जाधव यांनी केली......
0 टिप्पण्या