🌟पुर्णेत असंख्य मोकाट जनावरांमध्ये जोमाने फैलतोय लम्पी स्किन डिसीज त्वचारोग : नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष....!


🌟या गंभीर बाबीकडे निष्क्रिय पुर्णा नगर परिषद प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष🌟 


पुर्णा (दि.२९ आक्टोंबर २०२४) :- पुर्णा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोकाट फिरणाऱ्या मोकाट जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या गंभीर त्वचारोगाचा फैलावर जोमाने होत असल्याचे निदर्शनास येत असून सदरील मोकाट जनावर एकमेकांसह पशुपालक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या देखील संपर्कात येत असल्यामुळे शहरासह तालुक्यात लम्पी स्किन डिसीज (त्वचारोग) या रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात फैलत आहे.

पुर्णा शहरातील जुना मोंढ्यात भरणाऱ्या बाजारात तसेच नवा मोंढयातील आडत दुकानांच्या परिसरात तसेच गावातील विविध परिसरासह शहरालगतच्या शेत शिवारांसह ग्रामीण भागातील शेत शिवारांमध्ये देखील या लम्पी स्किन डिसीज आजार ग्रस्त मोकाट जनावरांच्या झुंडी फिरताना दिसत असल्याने या लम्पी स्किन डिसीज (त्वचारोग) या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलतांना दिसत असून या गंभीर बाबीकडे पुर्णा नगर परिषद प्रशासनासह ग्रामीण भागांतील ग्रामपंचायत प्रशासन देखील हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्यामुळे हा अत्यंत चिंतेचा विषय झाला आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या