🌟शेअर बाजार गडगडला : गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपये गेले पाण्यात....!


🌟बँक निफ्टी,स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली आहे🌟

✍️ मोहन चौकेकर 

काल सकाळपासून शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजार कमी तोट्यात होता. पण हळूहळू तीव्र घसरण होत गेली काही वेळातच गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

बँक निफ्टी, स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली आहे. बँक निफ्टीमध्ये ११०० हून अधिक अंकांची घसरण झाली तर सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला होता. याशिवाय निफ्टी ३०० अंकांनी घसरला होता. गेल्या काही दिवसांपासून तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणूकदारांची सततची माघार यामुळे भारतीय शेअर बाजार दबावाखाली आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज घसरत आहे. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप पोर्टफोलिओ शेअर बाजारात त्सुनामीप्रमाणे कोसळले. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ९.८ लाख कोटी रुपयांनी घसरून ४३५.१ लाख कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ केवळ एका दिवसात गुंतवणूकदारांचे मूल्यांकन सुमारे १० लाख कोटी रुपयांनी कमी झाले.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या