🌟नांदेड लोकसभेसाठी रविंद्र वसंतराव चव्हाण राहणार महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार🌟
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची देखील भारत निवडणूक आयोगाने दि.१५ आक्टोंबर २०२४ रोजी घोषणा केली होती.
महाराष्ट्र विधानसभेसह नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच काँग्रेसने दोनच दिवसांत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रविंद्र वसंतराव चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.
पोटनिवडणुकीसाठी जारी केलेल्या उमेदवारांच्या यादीत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच म्हणजे 20 नोव्हेंबरला नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे निवडून आले. लोकसभा निवडणुकीचा निकाल जून महिन्यात लागला. आणि त्याच्या दोन महिन्यांनी म्हणजे 26 ऑगस्टला खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती......
0 टिप्पण्या