🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन / बातम्या......!


🌟शरद पवारांकडून भरसभेत अजित पवारांच्या रडण्याची नक्कल🌟 

✍️ मोहन चौकेकर

💫 काँग्रेसचे 102, शिवसेनचे 96 तर राष्ट्रवादीचे 87 जागांवर उमेदवार जाहीर, 5 जागांवर महाविकास आघाडीकडून दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर ; महायुतीच्या जागावाटपाचं चित्र समोर, शिवसेनेचे 79 जागांवर उमेदवार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 जागा, भाजपकडून 148 उमेदवार जाहीर 

💫 शरद पवारांकडून भरसभेत अजित पवारांच्या रडण्याची नक्कल,लोकसभेला दिलेल्या सल्ल्याची विधानसभेला व्याजसह परतफेड  ; तात्यासाहेबांचं घर कुणी फोडलं? अजित पवारांचा प्रश्न, शरद पवारांकडून जोरदार उत्तर, पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का ? घर मोडणे माझा स्वभाव,कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका 

💫.आर.आर.पाटील यांनी माझा केसाने गळा कापला,सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीच्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटीलांनी केलेली सही देवेंद्र फडणवीसांनी घरी बोलावून दाखवली,अजित पवारांचा धक्कादायक आरोप ; 'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', आबा हयात असते तर त्यांनी उत्तर दिलं असतं, अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया ; करेक्ट कार्यक्रम करायचं त्याच्या हातात, जनतेच्या हातात इस्लामपुरात अजित पवार यांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल, निशिकांत पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल 

💫 दादागिरी नहीं चलेगी...;बोरिवलीत गोपाळ शेट्टींचे कार्यकर्ते आक्रमक, संजय उपाध्याय यांचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा काढता पाय  ; भाजपकडून वडगाव शेरीसाठी एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर माघारी, तुम्हाला विधिमंडळात घेणार, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन 

💫भाजपला लातूरमध्ये मोठा धक्का, काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजपचे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांचा काँग्रेसमध्ये  पक्षप्रवेश ;सोलापूर दक्षिणसाठी नाव जाहीर केलं पण एबी फॉर्म नाकारला, काँग्रेसच्या दिलीप मानेंनी अपक्ष अर्ज भरला, उमेदवारी जाहीर करण्याऱ्यांनी एबी फॉर्म आणायला हवा होता, 4 नोव्हेंपर्यंत भूमिका जाहीर करणार

💫 मनसेचा वांद्रे पूर्वमध्ये मोठा डाव,नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्वमधून रिंगणात उतरवलं, राष्ट्रवादीच्या झीशान सिद्दिकी अन् ठाकरेंच्या वरुण सरदेसाईंचं गणित बिघडणार ; नवाब मलिकांना अजित पवारांकडून मानखुर्द शिवाजीनगरसाठी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म,अजित पवारांनी मित्रपक्षांचा दबाव झुगारला, भाजप सेनेपुढं धर्मसंकट  

💫 जगा आणि जगू द्या या तत्वावर काम करणारी आम्ही माणसं, तुम्ही आडवे आलात तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही', सत्यजित तांबेंनी सुजय विखेंवर डागली तोफ ; प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार संगमनेरमधून दिला, विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया 

💫 हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीत  'सांगली पॅटर्न', हिंगोलीच्या जागेवर ठाकरेंकडून रुपाली राजेश पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी,काँग्रेसचे नेते भाऊ पाटील गोरेगावकर अपक्ष म्हणून रिंगणात

💫 मुंबई कसोटीपूर्वी कर्णधार रोहितची मोठी खेळी,गौतम गंभीरचा लाडका खेळाडू हर्षित राणाची भारतीय संघात एंट्री  

💫 शाहरुख खानच्या  कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन कर्णधार ठोकणार रामराम, श्रेयस अय्यरला दिल्ली कॅपिटल्सकडून ऑफर मिळाल्याच्या चर्चा.....

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या